डायनॅमिक डायरेक्टर्ससह मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यांनी पूर्ण उत्साहाने आणि कुशल व्यवस्थापनाने काम सुरू केले.
तुम्हा सर्वांशी संवाद साधणे हा खूप आनंददायी अनुभव आहे आणि खरोखरच माझे विचार तुमच्यासोबत शेअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. मी नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्यासाठी काम करत असतो कारण सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा हा एक प्रमुख मार्ग आहे. यामुळे मला सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते.
सन्माननीय सभासद बंधू– भगिनींनो, चेअरमन पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या यशोशिखराकडे नेणे हे एकच ध्येय समोर ठरविले आहे. संचालक मंडळ, सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. अलीकडे आधुनिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत घेतलेले असताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याकरिता संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेच्या व्यावसायिक प्रगतीची व उपक्रमाची अद्यावत माहिती सादर करताना मला अत्यंत आनंद हॊत आहे. सर्व सामान्य माणसाचे आर्थिक जीवन सहकार्याच्या माध्यमातून उज्वल व्हावे या उद्देशाने एकत्र येवून स्थापन केलेल्या संस्थेने सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करुन इतरांकरिता आदर्श निर्माण केलेला आहे.
विद्यमान संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अपार अपरिश्रमाने व विनम्र सेवेच्या भरवश्यावरच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. हे संकेतस्थळ प्रगतीचा, वाटचालीचा आरसा असला तरी आपल्या सहकार्याने व मार्गदर्शन सूचनेने तो अधिक पारदर्शक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
सर्व सामान्यांच्या गरजा पुर्ण करुन संस्थेच्या परिसराचा कायापालट घडवून आर्थिक विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी कामाची गती वाढली पाहिजे. आपणा सर्वांचे जीवन आनंदी व समृध्द करण्याचे आपले स्वप्न आपणांस साकार करण्याचे आहे. संचालक मंडळ, सभासद, खातेदार अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व हितचिंतक या सर्वांचे सक्रीय सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल असा दृढविश्वास आहे.
आत्तापर्यंतच्या प्रगतीचा वेग कायम राखणेसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. संस्थे बद्दल निष्ठा व आपुलकी जपणारे आपले कर्तव्य तत्पर कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी,संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लेखापरीक्षक, कायदे सल्लागार, हितचिंतक सभासद आणि मोलाचे मार्गदर्शन करणारे सहकार खात्याचे अनेक अधिकारी यांच्या समर्थ व सार्थ सहकार्यामुळेच आज आपली संस्था यशस्वीपणे उभी आहे.आजपर्यंत आपले संस्थेस विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून आपले असेच बहुमोल सहकार्य संस्थेला लाभो व संस्थेची वाटचाल उत्तुंग शिखरावर पोहोचो हिच सदिच्छा….या यशस्वी वाटचालीतील आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद ! आपले सहकार्य असेच मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद!
शिवसह्याद्री सहकारी पतपेढी लि.मुंबई
संस्थापक
सातारा सहकारी बँक लि.
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे
संचालक
मुंबई सहकारी मंडळ
संचालक
महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लिमिटेड.
संचालक
शिवसह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सातारा
संस्थापक
ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
संस्थापक अध्यक्ष
अध्यक्ष
उपाध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
(अध्यक्ष)
(उपाध्यक्ष)
(समिती सदस्य)
(समिती सदस्य)
(समिती सचिव)
(अध्यक्ष)
(उपाध्यक्ष)
(समिती सदस्य)
(समिती सदस्य)
(समिती सचिव)
(अध्यक्ष)
(उपाध्यक्ष)
(समिती सदस्य)
(समिती सदस्य)
(समिती सचिव)