दैनिक ठेव योजना. ही एक सोयीस्कर बँकिंग योजना आहे जिथे एक अधिकृत एजंट तुम्हाला जमा करायचे असलेले पैसे तुमच्या दाराशी गोळा करतो.
ही योजना मुले, गृहिणी, व्यावसायिक, पगारदार लोक, दुकानदार, लहान व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये बचतीच्या सवयींना प्रोत्साहन देते.
तुमचे पैसे काही कालावधीत शांतपणे वाढतात आणि मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक कामे, घरगुती आणि वैयक्तिक खरेदी, विमा प्रीमियम भरणे, वार्षिक कर इत्यादी तुमच्या भविष्यातील वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी एकरकमी होतात.
व्यक्ती दररोज ठेवीसह १२ महिन्यांचा ठेव कालावधी.
आमचा प्रतिनिधी तुमच्या सोयीस्कर वेळी दररोज तुमच्या दाराशी ठेव गोळा करतो.
किमान ठेव रु.२०/- किंवा त्याच्या पटीत.
तुमच्या सोयीस्कर वेळी काढता येईल.
गरज पडल्यास, शिल्लक रकमेच्या ७५% पर्यंत कर्ज मिळवा.
दैनंदिन खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास मोबाईल बँकिंग app द्वारे RTGS / NEFT / Funds trasnfer आणि dth recharge संबंधित सेवा सुलभरित्या करता येईल.
ज्येष्ठ नागरिक , अपंग व गरजूंना बँकिंग घरपोच सुविधा.
भारतभर डी डी सुविधा.
कोअर बँकिंग.
सर्व शनिवार कामकाज सुरु.
१८ वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस खाते सुरु करता येईल.
दोन अथवा अधिक व्यक्तींच्या नावे खाते सुरु करता येईल.
प्रत्येक दिवसाच्या अखेरपर्यंत कमीत कमी जी बाकी असेल त्या बाकीवर द सा द शे संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या दराने व्याज देण्यात येईल. व्याज सहामाही म्हणजेच सप्टेंबर व मार्च महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा केले जाईल.
दैनंदिन खाते सुरु केल्यानंतर ग्राहकास खात्याचे पासबुक दिले जाईल , पुस्तक विनामूल्य दिले जाईल.
परंतु पुस्तक हरवल्यास , अथवा खराब झाल्यास द्याव्या लागणाऱ्या नवीन खाते पुस्तकासाठी शुल्क आकारले जाईल.
वरील नियमात पूर्व सूचना न देता फेरफार करण्याचा अगर आणखी काही नियम करण्याचा अधिकार संस्थेने आपणाकडे राखून ठेवला आहे.