ज्या व्यवसायाचे ठेवी, पैसे काढणे आणि उलट व्यवहार यासारख्या व्यवहारांची संख्या जास्त असते अशा व्यवसायिकांकडून चालू खाते उघडले जाते.
चालू खाते प्रामुख्याने मालक, भागीदारी फर्म, सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, ट्रस्ट, व्यक्ती संघटना इत्यादींसाठी उघडले जाते ज्यांचे दररोज मोठ्या प्रमाणात बँकिंग व्यवहार होतात, म्हणजेच पावत्या आणि/किंवा देयके.
चालु ठेव खाते व्यावसायिक फर्म, प्रोपायटी, भागिदारी, कंपनी तसेच वैयक्तिक व सहकारी संस्था वगैरे ग्राहकांच्या व्यवसायिक दैनंदिन बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बनविलेले आहे. या खात्यातून अधिकृत व्यक्ती, फर्म आवश्यकतेनुसार पैसे काढू शकते भरू शकते आणि धनादेशाच्या मदतीने रक्कम काढणे, अन्य व्यक्तींना धनादेश देणे, वर्ग करणे वगैरे व्यवहार संख्येवर मर्यादा नाही. सदर खातेवरील शिल्लक रक्कमेवर व्याज दिले जात नाही.
सदर खात्यावर खातेदार, फर्म, संस्था यांचे दिलेले अधिकारानुसार त्या व्यक्तींना व्यवहाराचे अधिकार दिले जातात. चालू खाते हे व्यावसायिक, खाजगी / सार्वजनिक मर्यादित कंपन्या, संघटना, क्लब, सोसायटी, विश्वस्त, संयुक्त हिंदू कुटुंब किंवा इतर संस्था यांना उघडता येऊ शकतात. चालू खात्यामध्ये रु.२०००.०० शिल्लक राखणे आवश्यक आहे. (minimum balance) कमीतकमी शिल्लक न राहिलेस चार्गेस लागू राहतील. संस्था व चालक यांच्या के. वाय. सी., व्यवसाय दाखले, अन्य बँकेत खाते असलेस एन. ओ. सी आवश्यक राहील.